Good News – आजपासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत योजनेची अंमलबजावणी
लोकगर्जनान्यूज
बीड : शासनाने अर्थसंकल्प अधिवेशनात महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलतीची घोषणा केली. याची अंमलबजावणी आज शुक्रवार ( दि. १७ ) पासून करण्यात आली आहे. तसे आदेश गुरुवारी ( दि. १६ ) रा.प. महामंडळाकडून काढण्यात आला. यामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य शासनाने ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासासाठी महिलांना भाड्यात 50 टक्के सवलतीची घोषणा केली. परंतु याची अंमलबजावणी सुरू नव्हती त्यामुळे वाहक व महिला प्रवासी यांच्यात खटके उडत होते. याचा लातूर जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु आज शुक्रवार ( दि. 17 ) पासून महिलांसाठी रा.प. महामंडळाच्या बस मध्ये राज्य हद्दपर्यंत सर्व प्रकारच्या गाडीत भांड्यामध्ये 50 टक्के सवलतीची अमंलबजावणी सु झाली. आजपासून सरसकट महिलांना फूल टिकिट काढण्याची आवश्यकता नाही. या सवलती मुळे महिलांना दिलासा मिळाला. महिला प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. या योजनेचा लाभ शहरी भागात अंतर्गत चालणाऱ्या बसला नाही.
सर्व प्रकारच्या गाडीत सवलत
महिलांना बस प्रवास भाड्यात सर्व प्रकारच्या म्हणजे साधी,मिनी, निमआराम, विनावातानुकूलीत, शयन-असानी, शिवशाही असानी, शिवनेरी,शिवाई वातानुकूलित यासह भविष्यात रा.प. महामंडळाच्या ताफ्यात नवीन येणाऱ्या गाड्यांमध्ये 50 टक्के सवलत राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
तिकीट रहाणार वेगळं
‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाईल. महिलांसाठी अर्धे तिकीट असल्याने यासाठी नवीन वेगळं तिकीट रहाणार आहे. त्यांचं रंग व डिझाईन याबाबत अद्याप काही समोर आले नाही. ते नंतर कळविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
“या” प्रवाशांसाठी सवलत नाही
जे महिला प्रवासी ऑनलाईन पद्धतीने आरक्षण ( Reservation ) करतील त्या महिलांना जे तिकीट आहे तो पुर्ण रक्कम द्यावी लागणार आहे. अशा महिला प्रवाशांना 50 टक्के भाडे सवलत मिळणार नाही.
आदेश निघण्यापूर्वी आरक्षण ( Reservation ) करणाऱ्यांचे काय?
ज्या महिला प्रवाशांनी हे आदेश निघण्यापूर्वी रा.प. महामंडळाच्या बसचे आरक्षण ( Reservation ) केले आहे. त्या प्रवाशांना पुर्ण रक्कम द्यावी लागणार आहे. त्यांना या सवलतीचा लाभ देऊ नये असे म्हटले आहे.