ginger ale- आले ( आद्रक ) उत्पादकांना दर तेजीत आल्याने दिलासा

लोकगर्जनान्यूज
बीड : मागील एक दशकापासून अत्यंत कवडी मोल दराने विकली जात असलेले आले ( आद्रक) ( ginger ) चे दर चांगलेच तेजीत आले. यामुळे आले उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु हे दर टिकून राहतील का? दर वाढण्याचे कारण काय? असे प्रश्न आले उत्पादक शेतकऱ्यांना पडले आहेत.
मागील दहा वर्षांपासून आले ( ginger ale ) चे दर इतके पडले होते की, शेतकऱ्यांचा खर्च निघणं मुश्किल झाले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आले पीक घेणे सोडून दिले. आता अचानक आले ginger चे दर चांगल्या प्रकारे वाढले आहेत. जानेवारी महिन्या पासून सुरू झालेली दरवाढ सुरु असून सध्या बाजारात 8 हजार ते 12 हजार प्रतिक्विंटल दर असून, दोन दिवसांपूर्वी तर 15 हजार रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्याने डिजे लाऊन आनंद साजरा केल्याचा गंगापूर तालुक्यातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. आल्यास चांगला दर मिळत असल्याने आनंद साजरा करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मेहनतीचा मोबदला मिळत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
दर टिकून रहाणार का? दर वाढीचे कारणे
आले या पिकाला जवळपास मागील १० वर्षांपासून समाधान कारक दर मिळाला नाही. आले उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च निघणं ही यामुळे मुश्किल झाले. यास कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आले पीक घेण्याचे टाळले आहे. ज्यांनी आले लागवड केली त्यांचे अवेळी पाऊस, यामुळे लागलेली किड याचा परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट झाली. याचा परिणाम बाजारभावावर झाला अन् आले दर तेजीत आले. सध्या लग्न सराई चे दिवस असल्याने मागणी वाढली आहे. हे सर्व चित्र पहाता आले दर टिकून राहतील असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.