शिक्षण संस्कृती

gift for retired teacher-सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेची संधी;इतके मिळणार मानधन?

लोकगर्जनान्यूज

बीड : शिक्षक भरतीला वेळ लागत असल्याने रिक्त शिक्षकांच्या पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने एक निर्णय घेतला असून सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने सेवेची संधी देणार आहे. यासाठी त्यांना चांगलं मानधनही देण्यात येणार आहे. ही नियुक्ती कायमस्वरूपी शिक्षक मिळेपर्यंत रहाणार आहे. यामुळे हे ( gift for retired teacher ) सेवानिवृत्त शिक्षकांसाठी एक प्रकारे गिफ्ट समजण्यात येत आहे.

जसं प्रत्येकाला एकदा बालपण मिळावं अशी सुप्त इच्छा असते तशीच इच्छा जो विद्यार्थी प्रिय शिक्षक असतो अन् तो सेवानिवृत्त झाले की, काय करावे? असा प्रश्न असतो तसेच पुन्हा आपल्या हातात खडू , फळा व समोर मुलं असावीत असे वाटते पण ते शक्य नाही. परंतु आता हे स्वप्न शक्य होणार आहे. तसे पत्र निघाले आहे. राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. हे पदे भरण्यासाठी शासनाच्या हलचाली सुरू आहेत. परंतु भरती संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने शिक्षक भरती प्रक्रिया ठप्प आहे. परंतु रिक्त जागांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाने एक तोडगा काढला आहे. यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेची संधी देण्यात येणार आहे. या अशयाचे पत्र ७ जुलै रोजी निघालेले आहे. ही प्रक्रिया शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राबवणार आहेत. यामुळे सेवानिवृत्ती नंतर घरी बसून कंटाळलेल्या गुरुजींना पुन्हा आपल्या आवडीच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळणार असल्याने त्यांच्यासाठी हे gift for retired teacher एक अविस्मरणीय भेट असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
वय मर्यादा ७० वर्ष
यासाठी कंत्राटी पध्दतीने नेमण्यात येणारे शिक्षक हे जिल्हा परिषद, अनुदानित शाळा इतर अशा सेवानिवृत्त शिक्षकांना करारनामा करुन तात्पुरती नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षाची असणार आहे.
मानधन २० हजार
या सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षकांना या सेवेबद्दल शासनाने २० हजार मानधन प्रति महिना देण्यात येणार आहे. तोही इतर कोणत्याही लाभा व्यतिरिक्त असेही जाहीर केले आहे.

खालील निळ्या अक्षरांवर टच करुन वाचा सविस्तर माहिती 👇

सेवानिवृत्त शिक्षक भरती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »