भवताली

Electric scooter bike-खास शेतकऱ्यांसाठी चार्जिंगवर चालणारी दुचाकी; काय आहे विशेषत?

लोकगर्जनान्यूज

अनेक ( e bike ) विजेवर म्हणजेच चार्जिंगवर चालणाऱ्या ( Electric scooter bike ) इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आहेत. परंतु एका कंपनीने खास शेतकऱ्यांसाठी ( farmer ) चार्जिंगवर चालणारी ( Electric scooter bike ) दुचाकी बनवली आहे. या दुचाकीवरून शेतकरी भाजीपाल्याचे 6 ते 8 कॅरेट अथवा दुधाचे 6 कँड सहज घेऊन जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. सदर दुचाकी पुणे येथील कृषी प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली होती. तसेच येथे बुकिंग करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वस्तात उपलब्ध होती.

वाढते इंधनाचे दर पहाता अनेक कंपन्यांनी चारचाकी,दुचाकी ही वाहने चार्जिंगवर चालणारी बनविली आहेत. याला मिळत असलेला प्रतिसाद पहाता अनेक कंपन्यांनी बाजारात विविध प्रकारच्या ( e bike ) बाजारात आणलेल्या आहेत. यात स्कूटर,बाईक हे प्रकार आहेत. परंतु आता एका वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनीने खास शेतकऱ्यांसाठी ( Electric scooter bike ) इलेक्ट्रिक बाईक तयार केली. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना शेतातून भाजीपाला, दूध आदि वाहतूकीची अडचण समोर ठेवून ( Electric scooter bike ) इलेक्ट्रिक बाईक निर्माण केली. अनेक वेळा शेतकऱ्यांना शेतातून अथवा गावातून शहरात, बजारात भाजीपाला, दूध नेहण्याची अडचण होते. त्यामुळे शेतकरी एकतर खाजगी वाहनाने अथवा आहे त्या दुचाकीवरून याची वाहतूक करतात. परंतु या ( Electric scooter bike ) इलेक्ट्रिक बाईक मुळे शेतकऱ्यांची ( farmer ) अडचण दूर झाली आहे. या नवीन खास शेतकऱ्यांसाठी चार्जिंगवर चालणारी दुचाकी ( Electric scooter bike ) वरुन शेतकरी सहज सहा ते आठ केरेट अथवा दूधाचे सहा कँड सहज वाहून नेऊ शकतात. विशेष म्हणजे याला इंधनाचा खर्च नाही. तसेच कंपनीने शेतकऱ्यांसाठी ही ( Electric scooter bike ) बनवली असल्याने मजबूतीच्या दृष्टीने विचार करुन पुर्ण बॉडी मेटलची दिली आहे. तसेच प्रतितास ५० किमी अशी वेग ( speed ) असणार आहे.
किंमत
या गाडीची शोरुला ८१ ते ८२ हजार किंमत असु शकते. परंतु पुणे येथील किसान प्रदर्शनात ही ( Electric scooter bike ) दुचाकी शेतकऱ्यांसाठी ७६ हजार ५०० रु. मध्ये उपलब्ध होती.
एका चार्जमध्ये ११० किमी धावणार
एकदा चार्ज केली की, ही दुचाकी ११० किमी पर्यंत धावणार आहे. त्यामुळे शेतकरी सहज जवळच्या शहरात, बाजारात आपले साहित्य घेऊन जाऊ शकतो.
आणखी काही खास वैशिष्ट्य
स्पोक टायर, टेलिस्कॉप व ऑईल स्प्रिंग शॉकप असल्याने मजबूत आहे.
१७० MM चा ग्राऊंड क्लिअरन्स आहे.
या दुचाकीच्या गतीचे तीन मोड ( गिअर ) आहेत.
या दुचाकीला मिड मोटार असल्याने बॅलन्सला मदत होते. यासह आदी खास वैशिष्ट्य आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »