Electric car- दोन लाखांच्या आत मिळणारी आकर्षक Ev कार लॉन्च ( launch )
लोकगर्जनान्यूज
सध्या इलेक्ट्रिक ( Electric ) कार व दुचाकींची क्रेझ आहे. वाढते इंधनाचे दर पहाता अनेकांचा कल हा चार्जिंगवर चालणाऱ्या वाहनांच्या खरेदीकडे आहे. अशातच भारतात नुकतीच याकुजा करिश्मा ( Yakuza Karishma ) ही सर्वात लहान आणि स्वस्त कार हरियाणातील एका कंपनीने लॉन्च ( launch ) केली. याची किंमत व वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी ही बातमी पुर्ण वाचा.
याकुजा करिश्मा ( Yakuza Karishma ) ही हरीयाणा राज्यातील सिरसा येथे इलेक्ट्रिक ( Electric ) वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनीने सादर ( launch ) केली. ही कार देशातील सर्वात लहान कार पैकी एक असून यामध्ये केवळ तीन जण प्रवास करु शकतात. याची किंमतही दुचाकीच्या तुलनेत असून, अनेकांच्या बजेटमध्ये बसणारी आहे. एकदा चार्ज केली की, ही कार ६० ते ७० कि.मी. चालेल. यामुळे जवळचा प्रवास करणाऱ्यांसाठी ही कार फायद्याची ठरणार आहे. याला फुल चार्ज करण्यासाठी ६ ते ७ तास लागतील असे सांगितले जात आहे. या याकुजा करिश्मा ( Yakuza Karishma ) कारमध्ये ६० व्ही ( v ) ४२ एएच ( ah ) पॉवरची बॅटरी आहे.
इतकी आहे किंमत
या इलेक्ट्रिक ( electric ) कारची एक्स-शोरूम किंमत १.७९ लाख रुपये असणार आहे. ते खरेदी करण्यासाठी, तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ते ऑनलाइन बुक करू शकता
इंटेरियर ( interior )
तीन सीटर असणार या कारचा लुक खूपच आकर्षक आहे. यामध्ये एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प, ब्रॉड ग्रिल, क्रोम डोअर हँडल, कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प, पॉवर विंडो, बॉटल होल्डर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.