crop insurance scheme-‘या’ कारणांमुळे पिकांचे नुकसान झाले तर क्लेम claim साठी तक्रार करा
पावसाचा खंड हा मुद्दा नसल्याने संभ्रम
लोकगर्जनान्यूज
बीड : शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना विमा ( crop insurance scheme ) कवच घेतलं आहे. यामध्ये पिकांना काढणी पुर्वी व पश्चात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई ( Claim ) मिळवण्यासाठी विमा कंपनीकडे 72 तासात तक्रार करणे आवश्यक आहे. परंतु कोणत्या कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास तक्रार करावी हे जाणून घेण्यासाठी ही बातमी पुर्ण वाचावी लागेल.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती संकटात सापडली आहे. निसर्ग कधी कोणता रुप दाखवेल अन् होत्याचं नव्हतं करेल याचा नेम नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना हक्काने नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना ( crop insurance scheme ) सुरू करण्यात आली. या योजनेमुळे पीक उभे असेपर्यंत अथवा काढणी पश्चात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले तर संबंधित पीकविमा कंपनी सर्वेक्षण करुन नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसान भरपाई देते. परंतु अनेक वेळा शेतकरी 72 तासात तक्रार करु शकत नाही. यामुळे अनेकांना पीकविमा भरपाई ( Claim ) मिळत नाही. असे प्रकार गतवर्षी सन 2022 मध्ये प्रकर्षाने दिसून आले. यामुळे कोणत्या कारणांमुळे नुकसान झाले तर तक्रार करावी? कुठे अन् कशी तक्रार करावी? ऑफलाईन तक्रार करता येते का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे प्रश्न तुम्हालाही पडले आहेत का? येथे आहे उत्तर.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती
स्थानिक नैसर्गिक आपत्तीत विमा संरक्षण क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी, वीज कोसळून लागणारी नैसर्गिक आग यामुळे पिकांचे नुकसान झाले की तक्रार केल्यानंतर वैयक्तिक पंचनामे करुन निकषांच्या आधीन राहून पीकविमा कंपनी कडून नुकसान भरपाई निश्चित केली जाते.
काढणी पश्चात नुकसान जोखीम
शेतकऱ्यांनी पीकविमा ( crop insurance scheme ) भरलेला असेल आणि पीक काढणी पश्चात शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकविणे आवश्यक असतं. अशावेळी काढणीनंतर पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्याच्या आत ( 14 दिवसात ) गारपीट, चक्रीवादळ व यामुळे झालेला पाऊस, बिगर मोसमी पाऊस यामुळे पिकांचे काढणी पश्चात तक्रार करावी. तक्रारीवरून कंपनी वैयक्तिक पंचनामे करून निकषांच्या आधीन राहून पीकविमा कंपनी कडून नुकसान भरपाई निश्चित केली जाते.
तक्रार कुठे करावी
ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा भरून योजनेत सहभागी झाले आहेत. विमा संरक्षण असलेले पीक वरील कारणांमुळे बाधित झाले असेलतर शेतकऱ्यांनी 72 तासात केंद्र शासनाच्या क्रॉप इन्शुरन्स ( Crop insurance App ) च्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार करावी. जर ऑनलाईन तक्रार करता येत नसेल तर पीकविमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18004195004 यावर फोन करुन तक्रार करावी. या दोन्ही पद्धतीने तक्रार करता येत नसेल तर आपण ऑफलाईन पध्दतीने लेखी स्वरुपात तक्रार करु शकता. हे लेखी सूचना फॉर्म बँक, कृषी विभाग अधिकारी, तसेच या लेखी फॉर्म मध्ये शेतकऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, अधिसुचित महसूल मंडळाचे नाव, बँकेचे नाव, आपत्तीचा प्रकार, बाधीत पीक, विमा भरलेली पावती अशी इ. माहिती असणे आवश्यक आहे.
पावसाचा खंड मुद्द्यावरुन संभ्रम
पीकविमा भरला यानंतर पावसाने खंड दिला तर पीक वाळून जाते. अथवा फुले, पाने , शेंगा गळून पिकांचे नुकसान होते. वाढ खुंटते याचाही परिणाम उत्पादनावर होतो. परंतु पावसाचा खंड ग्राह्य धरलं जाणार की, नाही. याबाबत जाहिरातीत खुलासा नाही. पावसाचा खंड पडल्यानंतर ( Claim ) मिळणार की, नाही? यावरुन संभ्रम निर्माण झाला आहे.
क्रॉप इन्शुरन्स ॲपवर हे मुद्दे
कोणत्या कारणांमुळे पीकविमा नुकसान भरपाई ( Claim ) मिळणार याबाबत प्राण्यांचा प्रादुर्भाव
ढग फुटले, चक्रीवादळ, चक्रीवादळ पाऊस,रोग, दुष्काळ, अतिवृष्टी,नैसर्गिक कारणांमुळे आग, गारपीट, जलप्रलय,भूस्खलन,कीटक आक्रमण,वीज,अवकाळी पाऊस इतकी कारणे आहेत.