कृषी

crop insurance scheme पीकविमा भरताय पण नुकसान भरपाई ( claim ) मिळविण्यासाठी हे दोन कामे आवश्यक?

कोणती ती दोन कामे जाणून घेण्यासाठी पुर्ण बातमी वाचा

लोकगर्जनान्यूज

१ रु. पीकविमा crop insurance scheme भरला जातोय यामुळे या योजनेचा शेतकरी जास्तीत जास्त फायदा घेणार यात शंका नाही. पण पीकविमा भरला की, नुकसान भरपाई claim मिळतोच का? तर याचे उत्तर नाही असेच येऊ शकते. यासाठी शासनाने आता नियम काढलं असून तुम्ही पीकविमा भरुन योजनेचा लाभ घेतला असला तरी नुकसान भरपाई claim मिळवण्यासाठी तुम्हाला दोन काम करणं आवश्यक आहे. ते दोन काम कोणते ते जाणून घेण्यासाठी ही बातमी पुर्ण वाचा.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती हा बिन भरोश्याचा व्यवसाय झाला. कधी पिकं पाण्यावाचून जातील किंवा पाण्यामुळे जातील याची शाश्वती नाही. तसेच इतरही कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव पडेल अन् हातातोंडाशी आलेला घास मातीत मिसळून जाईल याचाही नेम नाही. यावेळी शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली. या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना याचा फायदाही मिळाला आहे. परंतु काही शेतकरी नुकसान भरपाई ( claim ) मिळेल की, नाही. या शंकेने या पीकविमा योजनेचा ( crop insurance scheme ) लाभ घेत नसे. अन् आपल्या शेजाऱ्यांना मिळाला की, तळमळत असे. परंतु यावर्षी पासून महाराष्ट्र राज्य शासनाने १ रु.पीकविमा योजना लागू केली. यामुळे आता शेतकरी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेतील असे दिसून येत आहे. पण पीकविमा भरला म्हणजे नुकसान भरपाई मिळतेच का? तर याचं उत्तर नाही असेच येईल. पीकविमा कंपन्यांनी मागील दोन-तीन वर्षांपासून काही नियम बदलले आहेत. ज्यामध्ये अचानक भरपूर पाऊस झाला यामुळे पिकांचे नुकसान झाले. काढून ठेवलेले पीक वाहून गेले तर ऑनलाईन तक्रार आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन ई-पीक पहाणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पीकविमा योजनेत crop insurance scheme सहभागी शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार अन् ई-पीक पहाणी न चुकता करणे आवश्यक आहे.
तक्रार कुठे अन् कशी करावी?
पाऊस न पडल्याने पीक वाळून गेले असेल अथवा सततचा पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवरून ७२ तासांच्या आत संबंधित कंपनीकडे तक्रार करावी. जर मोबाईल नसेल किंवा ऑनलाईन तक्रार करता येत नसेल तर फोटो काढून लेखी स्वरूपात ऑफलाईन तक्रार विमा कंपनीच्या तालुका, जिल्हा प्रतिनिधी कडे किंवा जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या विमा कंपनीच्या कार्यालयात तक्रार करावी. यासाठी ७२ तासांच्या आत हा नियम कटाक्षाने पाळावा.
ई-पीक पहाणी आवश्यक
पीकविमा योजनेत सहभाग घेतला असेल अन् तुम्ही भरलेल्या पिकाला क्लेम claim नुकसान भरपाई जाहीर झाली असेलतर त्यासाठी तुमच्या सातबारावर ऑनलाईन ई-पीक पहाणी केलेली व त्यात त्या पिकाची नोंद असणं आवश्यक आहे.‌ जर तुम्ही ई-पीक पहाणी केलेली नसेल तर तुमची शेती पडिक दाखविली जाते. पेराच दिसत नसल्याने पीकविमा क्लेम claim जाहीर झाला असला तरी मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होतात. यामुळे हे दोन्ही कामे करणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी ही आपल्या मोबाईलमध्ये ई-पीक पहाणी ॲप व्हर्जिन,२.० डाऊनलोड करून करता येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »