crop insurance 2023-24- पीकविमा स्वीकारणं सुरू; 1 रुपया भरुन लाभ घ्या
लोकगर्जनान्यूज
बीड : नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाने पीक विमा योजना सुरू केली. यावर्षी पीक विमा स्वीकारणं सुरू झालं असून, यावर्षी अवघा 1 रुपया भरुन लाभ घेता येणार आहे. पीक विमा योजना ( crop insurance 2023-24 ) वर्षांसाठी 31 जुलै शेवटची तारीख आहे.
अतिवृष्टी, पावसाचा खंड, गारपीट,पूर, वादळ अशा एकना अनेक नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर कोसळतात. यामध्ये पिकांचे नुकसान होते. काढणी पश्चात ही हाती आलेले पीक अतिवृष्टी व वादळामुळे नष्ट होतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या नुकसानीची भरपाई मिळावी, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी शासनाने विविध पिकांसाठी ( crop insurance ) प्रधानमंत्री फसलं बिमा योजना पीक विमा योजना सुरू केली आहे. यावर्षी देशात व राज्यात ही बीड पॅटर्नच्या धर्तीवर पीक विमा योजना ( crop insurance 2023-24 ) राबविण्यात आली आहे. शासनाच्या नवीन आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अवघ्या 1 रुपयात विमा मिळणार आहे. याचे आदेशही राज्य शासनाने काढले आहेत. पीक विमा ( crop insurance 2023-24 ) भरुन घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभागी होण्याऱ्या इच्छुक शेतकऱ्यांनी बँकेत अथवा सीएसी, आपले सरकार सेंटरवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन पीक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. यासाठी शेवटची तारीख 31 जुलै 2023 घोषित करण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे
पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरताना 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, पीक पेरणी स्वंयघोषित पत्र अपलोड करावी. यानंतर हप्ता भरलेली पोच पावती जपून ठेवावी.
ई-पीक पाहणी आवश्यक
पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी ऑनलाईन ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे. जेव्हा नुकसान होईल व ज्या पिकांना क्लेम घोषित करायचा आहे तेंव्हा ई-पीक पाहणी मध्ये ते पीक असेल तरच क्लेम मिळेल. त्यामुळे सर्व पेरणी झालेल्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी. ई-पीक पहाणीला सुरवात झालेली आहे. शासनाचे अधिकृत ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावा.