Crop insurance-पिक विमा भरण्यास मुदत वाढ कृषीमंत्र्यांची माहिती
लोकगर्जनान्यूज
पिक विमा Crop insurance भरण्याचा आज सोमवार ( दि . ३१ ) शेवटचा दिवस असल्याने ऑन साईड चालत नसल्यानेअनेक शेतकरी चिंतेत होते. परंतु शेतकऱ्यांचे ही चिंता दूर झाली. राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी पिक विमा भरण्यास मुद्दत वाढ दिली.
यावर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीकविमा Crop insurance देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यामुळे पीकविमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत राज्यातील दीड कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग घेतला असल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली. परंतु यावर्षी पेरण्या उशिरा झाल्या तसेच टप्प्या टप्प्याने झालेल्या आहेत. यामुळे पीकविमा भरण्यासाठी १ महिन्याची वेळ असतानाही कामामुळे पिकांचा विमा भरता आलेला नाही. तसेच मागील पाच दिवसांपासून पीक विमा सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे. अशात आज ३१ शेवटचा दिवस असल्याने विमा भरता येणार की, नाही? अशी चिंता शेतकऱ्यांना होती. वेळ वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. अखेर कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी पीकविमा भरण्यासाठी तीन दिवसांची मुद्दत वाढ दिली. येत्या ३ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन पीकविमा Crop insurance भरुन घ्यावं असे आवाहन करण्यात आले.