cotton rate today – तीन दिवसांत कापूस दरात 400 रु. सुधारणा या मागचे कारण काय?

लोकगर्जनान्यूज
घसरलेल्या कापूस दरामुळे मे महिना संपत आला तरी घरातच कापूस पडून आहे. दोन दिवसांपूर्वी तर चक्क कापूस 6 हजार 600 प्रति क्विंटल इतका घसरला होता. पण शनिवार व मंगळवार या तीन दिवसांत पुन्हा प्रति क्विंटल 400 रु. सुधारणा कापसात दिसून येत आहे. या दर सुधारण्यामगे नेमकं कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रश्न उपस्थित करण्यामागे ही एक कारण असून, “कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लूटण्याचा व्यापाऱ्यांकडे सक्सेस प्लॅन” हा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला तसेच दर घसरण बाबतीत मोठी ओरड झाली. केंद्राने आस्ट्रोलीय येथून आयात केलेल्या गठाणचे फोटोंसह बातम्या प्रसारित झालेल्या आहेत. हा त्याचा परिणाम आहे की, खर्च कापूस बाजारात अचानक तेजी आली? असे एक ना अनेक प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
13 हजार 500 रु. यावर्षी कापूस बाजार खुला झाला. यानंतर 9 हजार 300 रु. कापूस बाजार बरेच दिवस स्थिर होता. तेव्हा जवळपास सर्व शेतकऱ्यांची कापसाची पहिली वेचणी झालेली होती. परंतु गतवर्षी शेवटपर्यंत 13 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत कापूस विकला गेल्यामुळे यावर्षी ही दर वाढतील म्हणून शेतकऱ्यांनी तो कापूस घरात ठेवणं पसंत केले. दुसरी वेचणी झाली तरी कापसाचे दर वाढले नाहीत. त्यामुळे कापसाची थप्पी घरातच ठेवली. परंतु कापसाचे दर वाढण्याऐवजी कमीच होत गेले. 9 हजार 300 वरुन कापूस चक्क 6 हजार 600 पर्यंत घसरला. 10 हजारांची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली. घसरत असलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जाऊ लागली. याच काळात सोशल मीडियावर शेतकऱ्यांचा कापूस कमी दरात कसा खरेदी करायचं असा एक व्यापाऱ्यांचा सक्सेस प्लॅन मेसेज ( पोस्ट ) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. केंद्र सरकारने आस्ट्रोलीय येथून कापसाच्या गाठी आयात केलेल्या आहेत. त्या गठाणीच्या फोटो सह कापसाचे भाव कसे वाढणार अशी बातमी व्हायरल झाली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असलेला दिसून आला. दुसरा कापूस लावण्याची वेळ आली तरी पहिला कापूस घरातच असून शेतकरी कसा जगणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. परंतु शनिवार ते मंगळवारी अचानक या तीन दिवसात कापसाच्या दरात अचानक 400 रु. सुधारणा झाली. आज सोमवारी ( दि. 29 ) cotton rate today 7 हजार 100 रुपये पर्यंत धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे दर निघाले. हेच दर गुरुवारी ( दि. 25 ) 6 हजार 650 होते. मग तीन दिवसांत सुधारणा कशी झाली. शेतकऱ्यांच्या संतापाची लाट वरपर्यंत पोचली का ? अशी विचारणा करण्यात येत आहे.