क्राईम

पतीच्या हल्ल्यात पत्नी गंभीर तर प्रियकर ठार; घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ

 

लोकगर्जना न्यूज

पत्नीचे पर पुरुषासी अनैतिक संबंध असल्याचे संशयातून एकाने पत्नी व तिच्या प्रियकरावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना गुरुवारी ( दि. १४ ) रात्री ९ च्या सुमारास तळणेवाडी ( ता. गेवराई ) येथे घडली आहे. यामध्ये पत्नी गंभीर जखमी असून प्रियकर ठार झाला आहे. या घटनेने गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बबन ज्ञानोबा खरसाडे ( वय ४५ वर्ष ) असे मयताचे नाव असून, याचे व गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सदरील महिलेच्या पतीने गुरुवारी ( दि. १४ ) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पत्नी व प्रियकर असलेल्या बबन वर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रियकर ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. काही लोकांनी मदत करत जखमीला तातडीने उपचारासाठी गेवराई येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. हल्ला करुन पती घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेने गेवराई तालुक्यात खळबळ उडाली आहे. आरोपी पती हा रात्री उशिरा स्वतः शेवगाव पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्यास ताब्यात घेतल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »