कृषी

Cooten ret-कसा जगेल शेतकरी; कापूस संपला अन् दर वाढले

७ हजार पेक्षा कमीने शेतकरी कापूस विकून मोकळा अन् आता मिळतोय ८ हजार दर

बीड | लोकगर्जनान्यूज

पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस ( Cooten ret) शेतकरी विकून मोकळे झाले आहेत. शेतकऱ्यांकडील कापूस संपताच दर वाढ झाली आहे. सध्या कापसाला हमीभाव पेक्षा जास्त प्रतिक्विंटल ८ हजार रुपये दर मिळत आहे. पण याचा फायदा व्यापारी अन् शासनाला होणार असल्याने शेतकरी मात्र केवळ मेहनतीचा मालक बनल्याचे चित्र असल्याने असेच होत राहिले तर शेतकरी जगेल कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शासनाकडून २०२४-२५ वर्षासाठी कापसाला ७ हजार ५२१ रु. प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला होता. पण हंगाम सुरू झाला तरी ७ हजार १०० ते ७ हजार २०० च्या पुढे दर काही सरकले नाही. उलट कमी होऊन ६ हजार ८०० ते ९०० प्रतिक्विंटल होऊन घसरण झाली. हमीभाव पेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून ओरड सुरू झाली आणि शासनाच्या धोरणावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली. हे चित्र पाहून शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी शासनाने सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू केली. येथे नोंदणी करुन शेतकऱ्यांचे कापूस हमीभाव प्रमाणे करण्यात आले. पण हे खरेदी केंद्र सुरू कमी अन् बंदच जास्त राहिल्याचे चित्र होते. यामुळे कापसाचे दर काही वाढण्याचे नाव घेतले नाही. तसेच खासगी बाजारात सध्याही कापूस खरेदी सुरू असताना शासनाने सीसीआय कापूस (Cooten) खरेदी केंद्र महिनाभरापूर्वी बंद केली. यामुळे आता आणखी कापसाचे दर पडतील म्हणून शेतकऱ्यांनी कापूस ६ हजार ५०० ते ८०० रु. विकून हमीभाव पेक्षा हजार ते ८०० रु. नुकसान सहन केले. पण शेतकऱ्यांकडील कापूस संपताच बाजारात दरवाढ सुरू झाली आहे. शेतकऱ्यांजवळ कापूस होता तोपर्यंत हमीभाव पेक्षा कमी भाव मिळाला पण याचे भाव वाढून हमीभाव पेक्षाही जास्त म्हणजेच सध्या ७ हजार ८०० ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. पण या दरवाढीचा शेतकऱ्यांना एक कवडीचाही फायदा होणार नाही. याचा फायदा केवळ व्यापारी ज्यांनी कापूस (Cooten ) साठवून ठेवला असे अन् शासनाने सीसीआय केंद्रावर खरेदी केलेल्या कापसाला म्हणजे शासनाला होणार आहे. तर सोयाबीनचे असेच झाले असून शेतकऱ्यांकडील माल संपताच सोयाबीनचेही दर वाढले आहेत. यामुळे जर असेच होत राहिले तर शेतकरी जगेल कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »