Cbse चा निकाल आता लक्ष Ssc,Hsc बोर्डाच्या निकालाकडे; कधी जाहीर होणार वाचा
लोकगर्जनान्यूज
बीड : शुक्रवारी ( दि. 12 ) सीबीएसई ( cbse) चा निकाल लागला. यानंतर आता ssc,hsc बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडे महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले आहे. हा निकाल लवकरच लागण्याची शक्यता असून, बोर्डाने निकालाच्या दिशेने जोरदार तयारी सुरू केली. तरीही बारावी 12 निकाल मे अखेर अन् 10 वी चा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याचे वृत्त आहे.
फेब्रुवारी,मार्च महिन्यात राज्यातील ssc, hsc board परीक्षा पार पडल्या आहेत. परीक्षा सुरू होताच जुनी पेन्शन योजना मागणीसाठी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्यात आला. यामुळे काही काळ उत्तर पत्रिका तपासणी खोळंबली होती म्हणून 10,12 बोर्डाचा निकाल उशिरा लागणार असा अंदाज आहे. परंतु नेमका किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. परीक्षा होऊन जवळपास आता दोन महिने संपत आल्याने निकाल लागणं अपेक्षित आहे. यातच शुक्रवारी ( दि. 12 ) सीबीएसई ( cbse ) चा निकाल लागला आहे. यामध्ये राज्यातील मुलांनी चांगली कामगिरी बजावली आहे. परंतु सीबीएसई च्या विद्यार्थ्यांच्या संख्या तुरळक प्रमाणात आहे. ssc, hsc विद्यार्थी संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे या 10,12 बोर्डाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे निकाल कधी लागणार अशी विचारणा केली जात आहे. बोर्डाने अद्याप पर्यंत निकालाची तारीख घोषित केलेली नाही. पण बोर्डाची तयारी पहाता 12 चा निकाल मे महिन्याच्या शेवटी व 10 चा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.