Breaking News- चर्चेअंती ट्रक चालक-मालकांचा संप मागे
लोकगर्जनान्यूज
आताच्या घडीची मोठी बातमी समोर आली असून ट्रक व टँकर चालक मालकांचा कालपासून संप सुरू होता. या संपाचा अनेक ठिकाणी परिणाम दिसून आला. हा संप गृह मंत्रालयाच्या सोबत चर्चेअंती संप मागे घेण्यात आला असल्याचे वृत्त आहे.
हिट अँड रन ( hit and run ) केंद्राने कायदा केल्याने यामध्ये अपघात होऊन व्यक्ती मरण पावल्यास चालकांना दंडासह १० वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. या विरोधात देशभरातील ट्रान्सपोर्ट संघटनांनी तसेच चालकांनी १ जानेवारी पासून आंदोलन सुरू केले. यामुळे आहेत तिथेच वाहने थांबली आहेत. याचा परिणाम विविध ठिकाणी दिसून आला. सर्वाधिक फटका पेट्रोल पंपाना बसला आहे. याप्रकरणी ट्रान्सपोर्ट संघटनांची आणि केंद्रीय गृह विभागाची चर्चा सुरू होती. ही चर्चा संपली असून अद्याप हिट अँड रन hit and run कायदा लागू झाला नाही अशी माहिती दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.