bike accident- दोन अपघातात एक ठार,एक गंभीर; दोन्ही तरुण धारुर तालुक्यातील
लोकगर्जनान्यूज
केज / धारुर : शनिवारी रात्री व आज रविवारी सकाळी असे दोन अपघात ( bike accident ) घडले आहेत. यातील केज येथील अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाला तर धारुर येथील घाटात घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. हे दोन्ही तरुण धारुर तालुक्यातील खोडस येथील आहेत. या घटनेने मात्र गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अजय वैजनाथ गायसमुद्रे हा तरुण कार्यक्रमासाठी आलेल्या मामाला सोडण्यासाठी केज येथे दुचाकीवर गेला होता. मामाला फुलेनगर येथे घरी सोडून तो केज-मांजरसुंबा रस्त्यावर येताच सदरील तरुणाच्या दुचाकीला भरधाव वेगातील टिप्परने जोराची धडक दिली. यामध्ये सदरील दुचाकीस्वार अजय वैजनाथ गायसमुद्रे रा. खोडस ( ता. धारुर ) हा ठार झाला. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात सुरू आहे. ही घटना ताजी असतानाच गावात या अपघाताची चर्चा सुरू असताना दुसरा दुचाकीचा अपघात ( bike accident ) धारुर घाटात घडला. महेश बलभीम लाखे रा. खोडस ( ता. धारुर ) हा सकाळी खोडस येथून तेलगावला जाण्यासाठी दुचाकीवरून निघाला दरम्यान तो धारुर घाटात पोचला असता त्याच्या दुचाकीला धडक बसून अपघात घडला. यामध्ये महेश लाखे याच्या पायाला मार लागून गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु तातडीने मदत न मिळाल्याने महेशचं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. असे एकाच गावातील दोन तरुणाचे 12 तासांच्या फरकाने अपघात ( bike accident ) ची घटना घडल्याने यात अजय गायसमुद्रे हा तरुण ठार झाला असल्याने अन् दुसरा गंभीर जखमी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.