क्राईम

Beed police-व्यापाऱ्याला लूटनाऱ्यांच्या एका तासात मुस्क्या आवळल्या

तलवाडा, गेवराई पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी

लोकगर्जनान्यूज

सराफा व्यापारी विक्रीसाठी दुचाकीवरुन धनसांगवी कडे दागिने घेऊन जाताना पाळतीवर असलेल्या तिघांनी निर्जण स्थळी अडवून शस्त्राचा धाक दाखवून सोन्या, चांदीच्या दागिन्यांची पिशवी घेऊन पसार झाल्याची घटना तलवडा पोलीस ठाणे हद्दीतील मनुबाई जवळा परिसरात आज सकाळी 9 वाजता घडली. प्रकरणाची माहिती मिळताच गेवराई,तलवडा पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून, गेवराई तालुक्यात नाकाबंदी करून अवघ्या तासाभरात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

समेलेली अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील एक सराफा व्यापारी गावोगावी फिरुन दागिने विक्रीचा व्यवसाय करतो. नेहमीप्रमाणे ते व्यापारासाठी तलवाडा परिसरातील मनूबाई जवळा मार्गे धनसांवगी येथे जात होते. यावेळी पाळतीवर असलेले तीन चोरटे वाट पहात निर्जनस्थळी रस्त्यावर दबा धरूण बसले होते. सदर व्यापारी येताच शस्त्राचा धाक दाखवून सोने , चांदी दागिन्यां यासह रोख रक्कम घेऊन पसार झाले. प्रसंगावधान राखत व्यापाऱ्याने तात्काळ तलवाडा व गेवराई पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ नरके आणि गेवराई पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष जंजाळ, सपोनि दिपक लंके यांनी सहकार्यांसह तपासाची गती मान चक्रे फिरवून एक तासात लुटणाऱ्या तीन संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत . यावेळी पोलीसांनी पुर्ण गेवराई तालुक्यात नाकाबंदी लावली होती. पकडलेल्या आरोपींमध्ये गेवराई,अंबड येथील प्रत्येकी एक असे दोन आणि एका आरोपी बाबतीत अद्याप काही माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »