Beed News -भीषण अपघात! चारजण ठार दोघे जखमी
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील जाटनांदूर ( ता. पाटोदा ) फाट्याजवळ आयशर टेम्पो व स्कॉर्पिओ ची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये स्कॉर्पिओ मधील चारजण ठार तर दोघे जखमी झाले. सदरील घटना आता काही वेळापूर्वी घडली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, बीड-अहमदनर रस्त्यावर जाटनांदूर ( ता. पाटोदा ) फाट्याजवळ अहमदनगर कडून बीडच्या दिशेने येत असलेली स्कॉर्पिओ क्रमांक MH 12 FK 9010 तर बीड कडून अहमदनगर च्या दिशेने जात असलेला आयशर टेम्पो क्रमांक MH 21 BH 3820 समोरासमोर धडक झाल्याने अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण आहे की, स्कॉर्पिओ समोरुन चेंदामेंदा झाली असून यातील चौघे जागीच ठार झाले. इतर दोघे जखमी आहेत. स्थानिक नागरिकांनी मदत करत जखमींना बीड येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती पोलिसांना दिली असून माहिती मिळताच अंमळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातातील मयतांची व जखमींची नावं समजु शकली नाहीत.