Beed News – दोन अपघातात एक ठार चार जखमी
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यात आज केज व माजलगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात एकजण ठार तर चौघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील वाढते अपघात चिंतेचा विषय ठरत असून अपघात रोखण्यासाठी काही प्रयत्न होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबिलवडगाव ( ता. बीड ) येथील रहिवासी जिल्हा परिषदेचे शिक्षक भागवत महादेव तांदळे आणि त्यांच्या पत्नी महानंदा तांदळे हे दुचाकीवरून नातेवाईकाच्या मुलीला स्थळ पाहायला जात होते. दरम्यान केज-मांजरसुंबा रस्त्यावर सांगवी सारणी पाटी जवळ आले असता दुचाकीला टिप्परने जोराची धडक दिल्याने घडलेल्या अपघातात भागवत महादेव तांदळे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी महानंदा तांदळे या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात आज गुरुवारी ( दि. १ ) सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. दुसरा अपघात माजलगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर सिड फॉर्म समोर इनव्हा कार व दुचाकीची धडक होऊन आज गुरुवारी ( दि. १ ) दुपारी १ च्या सुमारास घडला आहे. दुचाकी क्र. एम.एच. २२ ए एल ७०३१ पंढरी अंकुश अघाव रा. खैरी ता. सेलू ( जि. परभणी ) , महादेव पर्वतराव पोते रा. रायगव्हाण ता. पाथरी ( जि. परभणी ) अन् एक ५ वर्षांचा मुलगा लग्नाला जात होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीला इनव्हा क्र. एम.एच. ४४ वाय ३११३ या दोन वाहनांची धडक झाली यामध्ये दुचाकीवरील दोघे व लहान मुलगा जखमी झाले. या वाढत्या अपघाताच्या घटनांनी वाहन धारक चिंतेत आहेत.