Beed News-कार-दुचाकीच्या भीषण अपघातात दोन प्राध्यापक ठार

लोकगर्जनान्यूज
बीड : येथून शिरुर कडे सेवा बजावण्यासाठी जाताना प्राध्यापकांच्या दुचाकी व कारची धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेही ठार झाल्याची घटना आज सोमवारी ( दि. 3 ) सकाळी अहमदनगर रस्त्यावर शहराजवळील म्हसोबा फाट्याजवळ घडली आहे. धडक होताच दुचाकीने पेट घेतला तर कार रस्त्याच्या खाली गेली.
प्रा. शहादेव शिवाजी डोंगरे आणि प्रा. गव्हाणे अंकुश साहेबराव हे दोघे शिरुर का. येथील कालीकादेवी महाविद्यालयात ज्ञान दानाचे कार्य करतात. हे दोघे नेहमी प्रमाणे दुचाकीवरून शिरुर कासार येथे चालले होते. दरम्यान ते अहमदनगर रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंप ( म्हसोबा फाटा) येथे आले असता भरधाव वेगात असलेल्या कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही प्राध्यापकांना जबर मार लागल्याने दोघांचाही मृत्यू झाला. धडक बसल्यानंतर दुचाकीने पेट घेतला तर कार रस्त्याच्या खाली जाऊन खांदलेल्या रस्त्याच्या मातीला अडकली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.