Beed News – बीड जिल्ह्यात सीबीआय,ईडीचा छापा?

लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर सीबीआय व ईडीच्या पथकाने छापा मारल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु तो कारखाना कोणता? नेमकी कोणत्या तालुक्यात कारवाई झाली हे अद्याप समोर आले नाही.
बीड जिल्ह्यातील एका साखर कारखाना विरोधात सीबीआय व ईडी कडे तक्रार करण्यात आली होती. सदरील तक्रारीची दखल घेऊन दोन्ही संस्थांचे दिल्ली येथून बुधवारी रात्रीच पथक जिल्ह्यात दाखल झाले. आज गुरुवारी ( दि. २९ ) पहाटेच पथक सदरील कारखान्यावर पोचले आहे. पहाटे पासून चौकशी सुरू असल्याचे बोलले जात आहे. परंतु हा कारखाना कोणता? कोणत्या तालुक्यातील? हे काहीच समोर आलेले नाही. परंतु ईडी व सीबीआयने छापा मारल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या कारवाई बाबतीत मोठी गुप्तता पाळली जात असल्याचे दिसून येत असून, रात्री पासून पथक जिल्ह्यात दाखल होऊनही कोणालाच कसे समजले नाही? असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे.