केज तालुक्यात विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

केज : ट्रक घेण्यासाठी माहेरहून चार लाख रु घेऊन ये; म्हणून विवाहीतेचा सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून नाव्होली ( ता. केज ) येथील एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बाबासाहेब घाडगे रा. लाखा ता. केज यांची मुलगी राधा हिचा विवाह तालुक्यातील नाव्होली येथील अशोक वामन वरपे सोबत रितीरिवाज प्रमाणे झाला. काही दिवस आनंदात गेले. त्यांना कन्या रत्न झाले. आनंदात संसार सुरू असताना राधाला पती अशोक वरपे व सासू, सासरा व नात्यातील महिला यांनी संगनमत करून मारहाण केली. ट्रक घेण्यासाठी माहेरहून चार लाख रु. घेऊन ये म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून ( दि. १५ ) शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास राधा अशोक वरपे रा. नाहोली ( ता. केज ) विषारी द्रव्ये प्राशन करून आत्महत्या केली.या प्रकरणी मयताचा भाऊ सागर घाडगे यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२२/२०२२ भा.दं.वि. ४९८ (अ), ३०६, ३२३, ५०४ व ३४ नुसार मयताचा पती अशोक वामण वरपे, सासरा वामन दादाराव वरपे, सासु मीराबाई वामन वरपे आणि मावस सासु मंदाकीनी लक्ष्मण दातार यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत. पोलीसांनी याप्रकरणी पती व सासऱ्याला अटक केली आहे.