Beed Lcb-उत्सुकता संपली एलसीबीला मिळाला अधिकारी

लोकगर्जनान्यूज
बीड : येथील रिक्त स्थानिक गुन्हे शाखा ( Lcb ) या प्रमुख शाखेवर कोणाची वर्णी लागणार याकडे बीड पोलीस दलासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यासाठी अनेक नावे चर्चेत असल्याने नेमकी कोणाची नेमणूक होणार ही उत्सुकता होती. ती संपुष्टात आली असून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी Lcb पोलीस निरीक्षक पदावर संतोष साबळे यांची नियुक्ती केली.
बीड जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा ( Beed Lcb ) चे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांची जिल्ह्याच्या बाहेर बदली झाली. यामुळे मागील आठवडा भरापासून स्थानिक गुन्हे शाखा Beed Lcb चे पोलीस निरीक्षक पद रिक्त होते. पोलीस दलातील ही म्हत्वाची शाखा असल्याने यावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. या नियुक्तीसाठी अनेक नावं चर्चेत होती. दोन दिवसांपूर्वी प्रभारी म्हणून बंटेवाड यांची नियुक्ती झाली. यामुळे कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त होण्यास वेळ लागणार असा अंदाज लावण्यात येत होता. परंतु पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज Beed Lcb ला कायमस्वरूपी पोलीस निरीक्षक म्हणून बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची नियुक्ती केली.