Beed-Dharur- एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर – एसटी व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज रविवारी दुपारी धारुर शहरालगत केज रोडवर घडली आहे. हा अपघात इतका भीषण आहे की, दुचाकीचे अक्षरशः तुकडे झाले आहेत.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, कळंब-माजलगाव एसटी क्रमांक MH 14 BT 2534 याची दुचाकी MH 44 J 9207 या दोन वाहनांची धडक होऊन शहरापासून जवळच भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार चंद्रभान भगवान मैंद रा. मैंदवाडी ( ता. धारुर ) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धारुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठवून दिला. अपघात झाल्याने रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमल्याने वाहतूक खोळंबली होती. पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली. वाढत्या अपघाताच्या घटना पहाता जनतेतून काळजी व्यक्त केली जात आहे.