Beed Acb- सलग दुसऱ्या दिवशी दोन लाचखोर एसीबीच्या सापळ्यात
लोकगर्जनान्यूज
बीड : कालच दोन लाचखोरांवर एसीबी ( Acb ) ने कारवाई केली असून परत आजही तलाठी व एक खाजगी इसम असे दोघे लाच स्वीकारताना सापळ्यात अडकले आहेत. दोन दिवसांत चौघांवर एसीबी ( Acb ) कडून कारवाई झाल्याने बीड जिल्ह्यात लाचखोरीचे वाढते प्रमाण लक्षात येईल.
शेतीच्या दिवाणी प्रकरणी तडजोडीतून प्रकरण निकाली काढून तक्रारदाच्या सुनेच्या नावे करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार जमीन नावे लावण्यासाठी सौताडा ( ता. पाटोदा ) सज्जाचे तलाठ्याला दिवाणी न्यायालयाचे आदेश प्रत दिली. परंतु नाव लावण्यासाठी तलाठी प्रवीण संदीपान शिंदे याने २० हजार लाचेची मागणी केली. तर खाजगी इसम विशाल ठाकरे रा. सुप्पा ( ता. पाटोदा ) याने मध्यस्थी करून लाच देण्यास प्रोत्साहन दिले. रक्कम ठरल्याप्रमाणे आज गुरुवारी ( दि. ३० ) देण्याचे ठरले. परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीड एसीबी ( Beed Acb ) कडे तक्रार केली. त्यावरून एसीबी ( Acb ) पथकाने सापळा रचून वांजरा फाटा ( ता. पाटोदा ) येथे प्रवीण संदीपान शिंदे ( तलाठी सौताडा सज्जा ) विशाल ठाकरे खाजगी इसम या दोघांना रंगेहाथ पकडले. या दोघांवर पाटोदा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी एसीबीचा दणका बसल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.