लोकगर्जनान्यूज
बीड : शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस कर्मचारी लाच घेताना एसीबी ( Acb ) च्या सापळ्यात अडकले. सदरील कारवाई आज मंगळवारी ( दि. 22 ) सायंकाळी बीड एसीबी ( Beed Acb ) पथकाने केली. यामुळे बीड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
दाखल एका गुन्ह्यात आरोपीला सहकार्य करण्यासाठी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक ( psi ) लक्ष्मण किर्तने आणि पोलीस कर्मचारी रंजीत पवार यांनी 28 हजारांच्या लाचेची मागणी केली. ती टप्याटप्याने स्विकारली, यातील 10 हजार आज स्विकारताना पीएसआय लक्ष्मण किर्तने आणि कर्मचारी रंजीत पवार या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड ( Beed Acb ) पथकाने रंगेहाथ पकडले. काही महिन्यांपूर्वीच याच पोलीस ठाण्यात लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या ( Acb ) जाळ्यात अडकले आहेत. त्यानंतर पुन्हा ही कारवाई झाली असल्याने शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील लाचखोरीचा प्रकार चव्हाट्यावर आला. ही बातमी बाहेर येताच बीड पोलीस दलात खळबळ उडाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.