Beed- 41 महसूल मंडळात 16 ते 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड; अग्रीम मिळणार का?

लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील 41 महसूल मंडळांमध्ये तब्बल 16 ते 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड आहे. यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. यामुळे या महसूल मंडळांना पीकविमा कंपनी 25 टक्के अग्रीम देणार का? असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांचे प्रशासन व विमा कंपनीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. ते 41 महसूल मंडळ कोणती हे पहाण्यासाठी पुर्ण बातमी वाचा.
मागील तीन ते चार वर्ष वेळेवर पाऊस झाल्याने पेरणी वेळेवर होत. परंतु यावर्षी पुन्हा पावसाच्या लहरीपणाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते आहे. सुरवातीला यावर्षी वेळेवर तर वेळेअधी मान्सून येणार, चांगला पावसाळा असणार असा अंदाज देण्यात आला. परंतु हे अंदाज पुर्णपणे फोल ठरले. पेरणीही जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असे भाकीत केले गेले परंतु जून महिन्याच्या शेवटी व जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात झाली. यानंतर पीक तरतील असाच पाऊस झाला. नदीनाले,तलाव कोरडे ठाक असले तरी पिके जोमात वाढली.परंतु पुन्हा पावसाने दडी मारली आहे. ही दडी थोडी नाही तर काही महसूल मंडळात 16 दिवस ते तब्बल 21 दिवसांपेक्षा जास्त आहे. सोयाबीन हे अवघे 90 दिवसांचे पीक असून त्यात 16 ते 21 दिवस पाऊस नसल्याने हे पीक पिवळे पडून वाढ खुंटली आहे. तर ज्यांची पेरणी लवकर झाली त्या पिकाची फुल गळती झाल्याने उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. बीड जिल्ह्यात 21 दिवसांपेक्षा जास्त खंड असलेले 09 तर 20 दिवस खंड असलेले 16, 19 दिवस खंड असलेले 04, 18 दिवस 03, 17 दिवस 06, 16 दिवस 03 असे जिल्ह्यातील 41 महसूल मंडळ आहेत. सदरची माहिती दि. 18 ऑगस्ट पर्यंतची आहे. या महसूल मंडळातील पीकविमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम देण्याचा निर्णय होणार का? याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तालुका व दिवस निहाय महसूल मंडळ
16 दिवस
पेंडगाव ( ता. बीड ),टाकळसिंग ( आष्टी ), सिरसदेवी ( ता. गेवराई )
17 दिवस
म्हा. जवळा ( बीड ), तलवडा ( गेवराई ), लोखंडी ( अंबाजोगाई ), सिरसाळा, पिंपळगाव ( परळी ), कवडगाव ( वडवणी ),
18 दिवस
पिंपळनेर ( बीड ), बर्दापूर ( अंबाजोगाई ), दिंद्रुड ( माजलगाव )
19 दिवस
राजुरी न. ( बीड ), पाटोदा, थेरला ( पाटोद ), गंगामसला ( माजलगाव ),
20 दिवस
मांजरसुंबा, नेकनूर,लिंबागणेश ( बीड ), आष्टी, कडा, धामणगाव, पिंपळा ( आष्टी ), गेवराई, मोदळमोही, जातेगाव, उमापूर, चकलंबा, रेवकी ( गेवराई ), किट्टी आडगाव ( माजलगाव ), हनुमंत पिंप्री ( केज ), तिंतरवणी ( शिरुर का. )
21 दिवस
माजलगाव,तालखेड, नित्रुड ( माजगाव ), अंबाजोगाई ( अंबाजोगाई ), केज ( केज ), परळी ( परळी ), मोहखेड ( धारुर ), वडवणी ( वडवणी )