Beed- 30 हजारांची लाच घेताना नगररचनाकार सह एक ACB च्या जाळ्यात
लोकगर्जनान्यूज
बीड : बांधकाम परवाना देण्यासाठी 30 हजारांची लाच स्वीकारताना शिरुर कासार येथील नगररचनाकार व एक इसम असे दोघांना ACB ने रंगेहाथ पकडले आहे. सदरील कारवाई बीड शहरात आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
अंकुश लिमगे नगरपंचायत,शिरुर कासार नगररचनाकार व अन्य एक इसम असे दोघे लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकले आहेत. या लाचखोराने ऑनलाईन बांधकाम परवाना देण्यासाठी तक्रार दाराकडे 40 हजार लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 30 हजार देण्याचे मान्य केले. परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने सदर व्यक्तीने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB कडे तक्रार केली. त्यावरुन आज बुधवारी ( दि. 30 ) लाचेचा सापळा लावला यामध्ये नगररचनाकार अंकुश लिमगे अन् अन्य एक इसम या सापळ्यात सहज अडकले आहेत. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.