Beed-24 तासात मोठा मासा ACB च्या गळाला जिल्ह्यात खळबळ
लोकगर्जनान्यूज
बीड – तलावात गेलेल्या मावेजा मागणी अर्ज निकाली काढण्यासाठी 10 हजार रुपये लाच एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या हस्ते स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या ( ACB ) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी भूसंपादनाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांच्यावर कारवाई केल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून बुधवारी माजलगाव येथे कारकून ( ACB ) च्या जाळ्यात अडकला अन् आज गुरुवारी उपजिल्हाधिकारी यामुळे प्रशासनाचा बरबटलेला काळा चेहरा उघडकीस आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
बीड तालुक्यातील तक्रारदार शेतकऱ्याच्या आईंच्या नावे असलेली जमीन व घर तलावात गेले आहे. याचा मावेजा मिळावं म्हणून संबंधित कार्यालयात अर्ज केला. हा अर्ज निकाली काढण्यासाठी उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित शेतखऱ्याने बीड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ( ACB ) तक्रार केली. या तक्रारीवरून ( ACB ) भूसंपादन कार्यालयात लाचेचा सापळा लावला या सापळ्यात सागरे यांच्यासाठी लाच स्वीकारताना सेवानिवृत्त मंडळ अधिकारी अलगद अडकला. उपजिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्यावर ( ACB ) ची कारवाई झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् जिल्ह्यात खळबळ उडाली.