क्राईम
Beed-हृदयद्रावक! करंट लागून तरुणाचा मृत्यू

लोकगर्जनान्यूज
आष्टी : अंघोळ करुन बाथरुम मधून बाहेर येताना उघड्या वायरला हात लागल्याने २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ऐन धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे घडली. ऐन सणासुदीच्या दिवशीच हृदयद्रावक घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, महेश दादासाहेब तोरडमल ( वय २६ वर्ष ) रा. सुलेमान देवळा ( ता. आष्टी ) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी ( दि. २५ ) सकाळी अंघोळ करुन महेश बाथरुम मधून बाहेर येताना बाथरुम जवळील वायरला हात लागल्याने विजेचा जोरदार धक्का बसला. यातच तरुणाचा मृत्यू झाला. महेश यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी,आई असा परिवार आहे.