Beed-सफाई करताना नालीत मृतदेह आढळला
लोकगर्जनान्यूज
बीड : नगर पालिकेचे कर्मचारी सुभाष रोडवर नालीची सफाई करताना जेसीबी ( JCB ) च्या खोऱ्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह वर आल्याचे पाहून एकच खळबळ उडाली. नालीत मृतदेह आढळल्याची शहर पोलीसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविले.
शहरातील मोठ्या नाली सफाईचे काम नगर पालिकेने बुधवारी सुरू केले. सुभाष रोडवरील सार्वजनिक स्वच्छतागृह जवळ नालीची जेसीबीने ( JCB ) सफाई सुरू होती. यावेळी अचानक जेसीबीच्या खोऱ्यात मृतदेह वर आला. मृतदेह पहाताच कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे काम थांबवून स्वच्छता निरीक्षकांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी, पोलीसांना माहिती दिली. माहिती मिळताच नगर पालिका अधिकारी, शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. बातमी लिह पर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. या मृतदेहामुळे शहरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.