BEED-महावितरणचे दोन लाचखोर कर्मचारी एसीबी ( ACB ) च्या जाळ्यात
लोकगर्जनान्यूज
माजलगाव : येथे आज बुधवारी ( दि. ५ ) रोजी येथील महावितरणचे दोन कर्मचारी १३ हजारांची लाच स्वीकारताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( ACB ) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे माजलगावात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराच्या घरी वीज मीटर बदलून देण्यासाठी रामा बन्सीधर लोखंडे कनिष्ठ लिपिक, महावितरण उपविभाग माजलगाव, ज्ञानेश्वर जगन्नाथ पांचाळ कनिष्ठ सहाय्यक या दोघांनी पंचासमक्ष तक्रारदाला ४० हजार लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १३ हजार घेण्याचे ठरले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ( ACB ) कडे तक्रार दाखल केली. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अमोल धस यांनी सहकार्यांसह माजलगावात लाचेचा सापळा लावला. यावेळी १३ हजार लाच स्वीकारताना ज्ञानेश्वर जगन्नाथ पांचाळ यास रंगेहाथ पकडले. महावितरणचे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची बातमी माजलगावात वाऱ्यासारखी पसरली एकच खळबळ उडाली आहे.