क्राईम

Beed- भीषण अपघात; मोहटादेवी दर्शनाला जाताना काळाची झडप दोन ठार सहा जखमी

लोकगर्जनान्यूज

बीड : मोहटादेवी येथे दर्शनासाठी जाताना चार चाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन चालक व एक चिमुकली जागीच ठार तर सहाजण जखमी झाल्याची घटना मानूर ( ता .शिरुर का. ) येथे आज शुक्रवारी ( दि. 25 ) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, तागडगाव येथील नाईकनवरे कुटुंब मोहटादेवी येथे दर्शनासाठी व्हिस्टा क्र. MH 44 G 1655 या कारने जात होते. दरम्यान ते मानूर ( ता. शिरुर का. ) जवळ आले असता वेगात असलेल्या कार अचानक रस्त्याच्या खाली जाऊन दोन ते तीन पलट्या मारल्याने अपघात घडला. यामध्ये चालक गोकुळ बापुसाहेब नाईकनवरे ( वय 40 वर्ष ) व 8 महिन्यांची चिमुकली दिव्या अजिनाथ मडके हे दोघे जागीच ठार झाले. तर उषाबाई गोकुळ नाईकनवरे ( वय 35 वर्ष ), लताबाई अंबादास नाईकनवरे, प्रगती गोकुळ नाईकनवरे ( वय 15 वर्ष ), दादा गोकुळ नाईकनवरे ( वय 14 वर्ष ), बाळु मच्छिंद्र सटले ( वय 18 वर्ष ), कोमल अजिनाथ मडके ( वय 24 वर्ष ) हे सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »