Beed-भीषण अपघात पाचजण ठार ?
लोकगर्जनान्यूज
बीड : दोन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. यामध्ये पाचजण ठार झाल्याची प्राथमिक माहिती असून घटनास्थळी पोलीस दाखल झाली आहेत. ही घटना नेकनूर पासून काही अंतरावरील ससेवाडी जवळ घडला आहे.
आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास नेकनूर जवळ कंटेनर व पिकअप वाहाची धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण आहे की, दोन्ही वाहनांची समोरुन चक्काचूर झाली असून यामध्ये पाचजण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाली असून बचावकार्य सुरू केले आहे. यातील मयताची नावे अद्याप स्पष्ट झालेले नसून जखमींची संख्या समजु शकली नाही. मागील जवळपास दोन तासा पासून रस्ता बंद असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काही वेळा पुर्वी वाहने एका बाजूने सुरू केल्याची माहिती आहे. अपघातात एकाच वेळी तब्बल ५ जण ठार झाल्याने खळबळ उडाली असून या घटनेने अंगावर काटा उभा राहिला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. वाढते अपघात जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय ठरत असून, असुरक्षित रस्त्यांमुळे अपघात वाढल्याची चर्चा आहे.