Beed – बीड येथे सामुहिक ( इज्तेमाई शादीयां) विवाह सोहळ्यात 102 जोडपे विवाहबद्ध
इज्तेमाई शादीयां कमिटी बीडचा आदर्श उपक्रम
लोकगर्जनान्यूज
बीड : शहरात मागील पाच वर्षांपासून इज्तेमाई शादीयां कमीटी यांच्या वतीने सामुहिक group marriage ( इज्तेमाई शादी ) विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षी या सोहळ्यात तब्बल 102 जोडपे विवाहबद्ध झाली. येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींसाठी जेवण तसेच वधु-वरांना कपडे अन् सर्व संसारोपयोगी साहित्य कमिटीच्या वतीने देण्यात आले. विशेष म्हणजे या सोहळ्यात बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील व मुंबई आणि हैद्राबाद येथील एक-एक जोडपे विवाहबद्ध झाले.
वाढती महागाईमुळे मुलींच्या पालकांना लग्न करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. केवळ पैशाच्या अडचणींमुळे काहीवेळा मुलीचे लग्न लवकर होत नाही. परंतु लग्न साधं व कमी खर्चात व्हावे अशी शिकवण इस्लाम धर्माची आहे. या मोहम्मद स. पैगंबरांच्या शिकवणी प्रमाणे लग्न व्हावे मुलींच्या पालकांना आधार मिळावा यासाठी बीड शहरातील समाजहिताचा विचार करुन सर्वच क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले. त्यांनी इज्तेमाई शादीयां कमिटी स्थापन केली. या माध्यमातून मागील पाच वर्षांपासून इज्तेमाई शादीयां group marriage ( सामुहिक विवाह सोहळा ) घेतात. या विवाह सोहळ्यात लग्नासाठी कसल्याही प्रकारची फीस नाही. यावेळी येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. तसेच नवदाम्पत्याला लागणारे संसारोपयोगी साहित्यासह कपाट,गादी,पलंग, कपडे कमिटीकडून दिले जाते. या सोहळ्यात प्रथम वर्षी 13 जोडप्यांचे विवाह झाले होते तर यावर्षी 102 जोडपे विवाहबद्ध झाले आहे. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री सुरेश नवले, आमदार संदीप क्षीरसागर, मा.आ. सय्यद सलीम,मा.आ. अमरसिंह पंडित, मा .आ. सिराज देशमुख, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, डॉ. सुरेश साबळे, पप्पू कागदे, हाजी अरफात, शब्बीर अन्सारी, मा.आ. राजेंद्र जगताप, श्रीमती ज्योती मेटे, अशोक हिंगे यांच्यासह आदि राजकिय, सामाजिक, पत्रकार, व्यापारी सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.