Beed-दोन भीषण अपघात चार ठार दोन गंभीर
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यात रात्री बीड-परळी व लोखंडी सावरगाव-लातूर रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. बीड-परळी मार्गावरील अपघात आई व दोन मुलं ठार झाली असून एक गंभीर जखमी आहे. तसेच लोखंडी सावरगाव-लातूर रस्त्यावरील अपघातात एक ठार एक गंभीर जखमी आहे.
बीड राजु चौक येथील रहिवासी शेख अजीम हे पत्नी , दोन मुले असे पुर्ण कुटुंब रिक्षाने थेटेगव्हाण ( ता. धारुर ) येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. रविवारी ( दि. १० ) रात्री परत बीडला जाताना दरम्यान बीड-परळी रस्त्यावर बकरवाडी पाटी जवळ आले असता समोरून आलेला कंटनेर क्रमांक एम. एच. १२ आर एन ०८७३ ने रिक्षा क्रमांक एम.एच. २० एफ एफ ०३१२ याला समोरा समोर जोराची धडक दिली. या मध्ये शेख नसरीन अजीम ( वय ३५ वर्ष ) शेख अदनान अजीम ( वय १२ वर्ष ), शेख नोमान अजीम ( वय १३ वर्ष ) आई व दोन मुलांचा मृत्यू झाला. शेख अजीम हे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.हा अपघात इतका भीषण आहे की, रिक्षाचा चेंदामेंदा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.
दुसरा अपघात लोखंडी सावरगाव रुग्णालया जवळ
रविवारी रात्रीच लोखंडी सावरगाव फाटा ते लातूर रस्त्यावर स्त्री रुग्णालयाजवळ पिकअप आणि दुचाकीची धडक होऊन घडलेल्या अपघातात एक ठार व एक गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेतून जखमीला अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील मयत व जखमीचे नाव समजु शकले नाही.