Beed-जिल्हाधिकारी ( Collector ) आदेशानुसार काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई
आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मोहीमेला सुरुवात
बीड | लोकगर्जनान्यूज
काळ्या काचा असणाऱ्या चार चाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करा असे आदेश जिल्हाधिकारी ( Collector ) दीपा मुधोळ-मुंडे यांनी पारित करताच एआरटीओ कडून कारवाई सुरू करण्यात आली. आदर्श आचारसंहिता लागू असेपर्यंत ही कारवाई मोहीम सुरूच राहणार आहे. यामुळे काळी काच असणाऱ्या वाहनधारकांची आता बीड शहर व जिल्ह्यात खैर नाही.
काळी काचा असणाऱ्या वाहनातून दारू, हत्यारे, पैसे याची वाहतूक कोणी करू नये तसेच लोकसभा निवडणूकीच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेने कारवाई केली जात आहे. पहिल्याच दिवशी काळ्या फिल्म लावलेल्या 45 वाहनांच्या फिल्म काढून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत बीड उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या पथकातील मोटार वाहन निरीक्षक पंकज यादव, सचिन जमखंडीकर, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक योगेश रबडे, पूजा खडकीकर, पवन गायके, श्रीराम क्षीरसागर, प्रदीप बिराजदार, शशिकांत जाधव, महेश भोसले अशा आठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. या पथकाने जालना रोडवरील बीड बायपास रस्त्यावर महालक्ष्मी चौकात मंगळवार ( दि. 19 ) सकाळ व संध्याकाळ दोन-दोन तास वाहनांची तपासणी करून 45 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या ( Collector ) आदेशानंतर आरटीओ यंत्रणा सतर्क झाल्याचे पाहायला मिळाली. सदरील मोहीम निवडणूक पूर्ण होईपर्यंत दररोज सुरू रहाणार आहे. यामुळे काळी काच असणाऱ्या वाहनधारकांची ही फिल्म काढून दंडात्मक कारवाई पासून सुटका करून घ्या अशी चर्चा सुरू आहे.