Beed- घरात सुरू होते गर्भलिंग निदान; आरोग्य विभागाने केला पर्दाफाश
लोकगर्जनान्यूज
गेवराई : शहरातील एका घरात अवैध गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. माहिती मिळताच आरोग्य विभाग अन् पोलीस ( एलसीबी ) पथकाने संयुक्त कारवाई करत छापा मारला असता तिथे एक डॉक्टर व महिला गर्भलिंग निदान करताना आढळून आली. महिलेला ताब्यात घेतले असून डॉक्टर फरार झाला. या कारवाईमुळे अवैध गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश झाला.
शहरातील संजय नगर घरावर छापा मारला असता याठिकाणी एक महिला ही गर्भलिंग निदान करताना अटक करण्यात आली. येथे डॉक्टर येथून पळून जाण्यात यशस्वी झाला. येथे पथकाला सोनोग्राफी मशीन, औषधे व इतर साहित्य आढळून आले. यामुळे येथे अवैध गर्भपात करण्यात येत होते का? असा संशय व्यक्त केला जात आहे. ते पोलीस तपासात निष्पन्न होईल. यापुर्वी या डॉक्टरवर अशीच कारवाई झालेली असून जामिनावर सुटका झाल्यावर पुन्हा त्याने हा गोरखधंदा सुरू केला. या कारवाईमुळे आरोग्य विभाग व पोलीसांचे आभार मानले जात आहे. बबन चंदनशिव आणि मनिषा सानप या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.