Beed-खळबळजनक! पाटोदा तालुक्यात गोळीबार
लोकगर्जनान्यूज
बीड – पाटोदा तालुक्यातील चिखली येथे रात्री उशिरा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोनजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती असून बातमी पसरताच पाटोदा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील चिखली येथे रात्री उशिरा गोळीबार झाल्याची घटना घडली. गोळीबारात दोघे जखमी असल्याची प्राथमिक माहिती असून, अद्याप जखमींची नावे समजू शकली नाहीत. लग्नातील भांडणाच्या कारणातून एका रात्री उशिरा हल्ला केला. हा हल्ला परतवून लावण्यासाठी स्वसंरक्षणासाठी समोरील व्यक्तीने बंदुकीतून गोळी झाडली असल्याचे वृत्त आहे. ही घटना समजताच अंमळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेचा कसून तपास करत आहेत.
दोघांवर ३०७ दाखल करणार – पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर
पाटोदा तालुक्यातील चिखली गोळीबार प्रकरणाची पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी दोघांवरही ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.