Beed-खळबळजनक!गोळ्या घालून सरपंचचा खून; परळीतील घटना
लोकगर्जनान्यूज
बीड : परळी तालुक्यातील एका गावाच्या सरपंचचा गोळ्या घालून खून करण्यात आल्याची घटना परळी शहरात ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर एकजण जखमी असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
बापूराव आंधळे असे मयत इसमाचे नाव असल्याचे असून ते मरळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच असल्याचे वृत्त आहे. परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात आज शनिवारी (दि.२९) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गोळीबारीची खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये बापूराव आंधळे यांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. गित्ते नामक व्यक्तीने गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अधिक माहिती समोर आलेली नसून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. या घटनेने परळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.