Beed- क्षुल्लक कारणावरून गोळीबार; परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील हॉटेलमध्ये थरार

लोकगर्जनान्यूज
परळी : तालुक्यातील कन्हेरवाडी शिवारातील एका हॉटेलमध्ये सिगारेट पाकीट महाग दिल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादातून चक्क गोळीबार केल्याची घटना ( दि. 9 ) रात्री 10:45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
परळी-अंबाजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी ( ता. परळी ) शिवारात हॉटेल यशराज आहे. बुधवारी ( दि. 9 ) रात्री अनोळखी चारजण हॉटेलमध्ये आले. यावेळी त्यांनी येथून एक सिगारेट पाकीट घेतलं त्याचे 150 रुपये मागितले असता सिगारेट पाकीट इतके महाग का? या मुद्यावरून वाद सुरू झाला तो चक्क हनामारीपर्यंत पोचला. यावेळी त्या चौघांपैकी एकाने चक्क गोळीबार केला. फायरींग करताच हॉटेल मधील नोकरांनी शटर लावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी विलास आघाव ( हॉटेल चालक ) यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. क्षुल्लक कारणावरून चक्क प्रकरण गोळीबारात पर्यंत गेल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.