![Beed-अंबाजोगाईत पिस्टलसह एकास घेतले ताब्यात Beed-अंबाजोगाईत पिस्टलसह एकास घेतले ताब्यात](https://i0.wp.com/lokgarjananews.in/wp-content/uploads/2024/09/IMG-20240927-WA0171.jpg?resize=780%2C470&ssl=1)
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे यशवंतराव चव्हाण चौकात गावठी कट्टा (पिस्टल) जप्त करत एकास ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बीड स्थानिक गुन्हे शाखेने केली.
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी बीडचा पदभार घेतल्यापासून कारवायांचा धडाका सुरू केला आहे. या कारवायांमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे करणारे आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे. नुकतेच पाडसिंगी आणि उमापूर येथे तलावारींचा साठा जप्त केला. यानंतर अंबाजोगाई येथे एकजण कंबरेला गावठी कट्टा (पिस्टल) लावून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी एक पथक अंबाजोगाई येथे पाठविले या पथकाने अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौकात संशयित व्यक्तीला पकडून झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी कट्टा पिस्टल आणि जिवंत कारतूस असे एकूण ४४ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. तो जप्त करुन आरोपी अमित उर्फ सोन्या सुंदर गायकवाड रा. सदर बाजार अंबाजोगाई यास ताब्यात घेतले. सदरील आरोपीवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखा पोनि उस्मान शेख यांचे मार्गदर्शनाखाली ग्रेपोउपनि हनुमान खेडकर, पोह मारुती कांबळे, राजु पठाण, महेश जोगदंड, तुषार गायकवाड व चालक गणेश मराडे यांनी केली आहे.