आपला जिल्हाक्राईम

Beed-हृदयद्रावक घटना;अंगाची हळद निघण्याआधीच पती-पत्नीची आत्महत्या

लग्न होऊन जवळपास सव्वा महिनाच झाला अन् नवदाम्पत्याने मृत्यूला कवटाळले

लोकगर्जनान्यूज

बीड: अवघ्या सव्वा महिन्या पूर्वीच लग्न झालेल्या नवदाम्पत्याच्या अंगाची अजून हळदही निघाली नसणार मात्र या नवदाम्पत्याने राहात्या घरातच दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी केतुरा (ता.बीड) Beed येथे उघडकीस आली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अक्षय हरीभाऊ गालफाडे ( वय २६ वर्ष), शुभांगी अक्षय गालफाडे (वय २१ वर्ष) दोघे रा. केतुरा असे आत्महत्या केलेल्या नवदाम्पत्याची नावे आहेत. प्रत्येक तरुण-तरुणीचे लग्न आणि त्यानंतरच्या आयुष्यातील स्वप्न असतात. तसे या दाम्पत्याचे स्वप्न असतील पण लग्न होऊन अवघा दीड महिना झाला असताना त्यांनी टोकाचं पाऊल उचलले आणि अंगाची हळद निघण्याच्या आधी त्यांनी आयुष्य संपविले आहे. दररोज लवकरच उटणारे दोघेही पहाटे लवकरच उठतात पण आज ७ वाजले तरी दोघेही पती-पत्नी कसे उठले नाही म्हणून पाहिले असता दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. कुटुंबातील व्यक्तींनी हंबरडा फोडला हे ऐकून शेजारी धावले. याची माहिती पोलिसांना दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह बीड येथे जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. सकाळी ११ वाजता या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू होते. ही घटना घरगुती किरकोळ वादातून घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »