Beed-लाच मागितली एका पोलीसावर लाचलुचपत वि. ( acb maharashtra ) कारवाई

लोकगर्जनान्यूज
बीड : आज परत बीड जिल्ह्यातील एक पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या ( acb maharashtra ) जाळ्यात अडकला असून, 5 हजार लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
शिरुर कासार पोलीस ठाणे अंतर्गत तक्रारदाराच्या कुटुंबातील काही सदस्यांवर अदखलपात्र गुन्हा ( NC ) दाखल झाली. यामध्ये सहकार्य करण्यासाठी पोलीस कर्मचारी शिवाजी श्रीराम सानप याने 10 हजाराची लाच मागितली. तडजोडी अंती 5 हजार देण्याचे ठरले. यानंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ( acb maharashtra ) कार्यालयाकडे तक्रार आली. यावरून पडताळणी केली असता शिवाजी श्रीराम सानप याने लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून संबंधित लाचखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी वडवणी येथे एक पोलीस कर्मचारी लाच प्रकरणी अडकला असून पुन्हा आजही एका पोलीस कर्मचारी अडकला असल्याने लाचखोर सुसाट असल्याचे दिसून येत आहे.
बीड जिल्हा लाच खोरीत हे प्रथम आणतात?
मागील काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील लाचखोरावर मोठ्या प्रमाणात ( acb maharashtra ) लाचलुचपतच्या सापळ्यात अडकत आहेत. हे पहाता शासकीय लाचखोर कर्मचारी राज्यात बीड जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळवून देतात की, काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.