बीड जिल्हा हादरला तरुणाचा खून

लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : २२ वर्षांच्या तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने अंबाजोगाई तालुक्यात खळबळ माजली असून. दगडाने ठेचून मारल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेने बीड जिल्हा हादरला.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील चिचखंडी येथील तरुण अर्जून पंढरी गडदे ( वय २२ वर्ष ) हा शुक्रवार पासून बेपत्ता होता. आज रविवारी ( दि. २५ ) सकाळी चिचखंडी शिवारातच अर्जूनचा मृतदेह रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. ही बातमी गावात समजताच एकच खळबळ माजली. घटनेची माहिती पोलीसांना देताच अंबाजोगाई पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात पाठविला आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.