क्राईम

atm fraud – एटीएम कार्डची अदलाबदल करून भामट्याने घातला सव्वा लाखाचा गंडा

लोकगर्जनान्यूज

गेवराई : फसवणूक करणाऱ्या भामट्यांची कमी नसून, नवनवीन शक्कल लढवून ते सामान्य माणसांना लुटण्याचे कार्यक्रम करत आहेत. अशीच घटना गेवराई ( जि. बीड ) येथे एका भामट्याने पैसे काढण्यासाठी एटीएम मध्ये गेलेल्या व्यक्तीचे एटीएम कार्ड बदलून 1 लाख 20 हजार रु. काढून घेऊन ( atm fraud ) फसवणूक केली.

शेख कलीम रा गेवराई हे शनिवारी ( दि. 1 ) शहरातील जालना रोडवरील एसबीआय ( SBI ) एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले. ते पैसे काढत असताना एका अज्ञात व्यक्तीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शेख कलीम यांचे लक्ष विचलित करुण एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यांना अचानक बँकेच्या खात्यातून पैसे कटल्याचा मेसेज आला. यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. शेख कलीम यांनी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकांनो सावध रहा भामट्यांकडे आयडिया भरपूर
ऑनलाईन फसवणूक करताना फोनवरून ओटीपी घेणं, काही आमिष दाखवून फसवणूक करणे असे प्रकार घडतात. कधी अंगावर घाण टाकून, कधी पैसे पडल्याचे खोटे बोलून, बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीची नजर चुकवून पैशांची पिशवी चोरणे असे अनेक प्रकार यापुर्वी ऐकले, वाचले परंतु हा प्रकार नवाच ऐकण्यात आला. व्यक्ती पैसे काढत असताना अचानक गोंधळ घालण्यास सुरुवात करुन त्या व्यक्तीचे लक्ष विचलित करुण कार्ड बदलून फसवणूक केली. त्यामुळे एटीएम मधून पैसे काढताना लक्ष विचलित होऊ नये याची काळजी घ्यावी. अशा भामट्यांपासून सुरक्षित रहावं.
CCTV Footage – सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी
प्रत्येक ATM मध्ये CCTV कॅमेरा असतोच त्यामुळे ही घटना संबंधित ATM च्या कॅमेरात कैद झाली असणार, त्यामुळे CCTV फुटेज तपासून आरोपीला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »