Asp कविता नेरकर यांच्या पथकाची कारवाई: अडीच लाखांचा गुटखा पकडला
सात जणांवर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लोकगर्जनान्यूज
माजलगाव : तालुक्यातील दिंद्रुड येथे एका दुकानावर छापा टाकून अप्पर पोलीस अधीक्षक ( Asp ) कविता नेरकर यांच्या पथकाने जवळपास अडीच लाखांचा गुटखा पकडला आहे. या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा दिंद्रुड येथे विकला जात असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक ( Asp ) कविता नेरकर यांना मिळाली. यावरुन नेरकर यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. या पथकाने एका दुकानावर व दुकानाच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारला असता सदरील ठिकाणी विविध कंपनीचा बंदी असलेल्या गुटखा एकूण किंमत २ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तागड तानाजी, कर्मचारी देवानंद देवकते, संजय राठोड,म.पो. मेंडके यांनी केली.