ASP कविता नेरकर यांचा पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा:सात जुगारी ताब्यात तर ७० हजरांचा मुद्देमाल जप्त
केज : अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक ( ASP ) कविता नेरकर-पवार यांच्या पथकाने केज तालुक्यात पत्त्याच्या क्लबवर छापा टाकून सात जुगारी ताब्यात घेतले तर तिघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. यावेळी छाप्यात सुमारे ७० हजार रु. चा मुद्देमाल जप्त केला.
शुक्रवारी ( दि. १० ) अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांना गुप्त बातमीदारा कडून खात्रीलायक माहिती मिळाली की, केज पोलीस ठाणे हद्दीतील कोरडेवाडी येथे पत्याचा क्लब चालू आहे. या आधारे त्यांनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शिंगाडे आणि संजय राठोड, अनिल दौंड, तानाजी तागड, वंदना गायकवाड, रामेश्वर सुरवसे यांना कारवाईचा आदेश दिला. आदेश मिळताच पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन दुपारी ४:०० वा. सदरील ठिकाणी अचानक छापा मारला असता तेथे तिर्रट नावाचा जुगार सुरू होता. तिर्रट खेळत असलेले रामभाऊ जयवंत शिंदे, भगवान सिताराम कोरडे, केशव मारुती शिंदे, महिंद्रा सोपानराव यादव, आश्रुवा सुखदेव यादव, मधुकर अंबादास परळकर, रामकिसन निवृत्ती यादव या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.तर गंगाधर जयवंतराव शिंदे, दत्ता मधुकर कोरडे व दत्ता सुग्रीव गित्ते हे तीघेजन पळून गेले. या धाडीत ६९ हजार ६५० रु. आणि जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल याब्यात घेतला. पोलीस नाईक रामेश्वर श्रीराम सुरवसे यांच्या फिर्यादी वरून दहा जुगाऱ्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतीबंधक कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जुगाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.