ACB Trap सहा हजारांचा मोह नडला; दोघांवर गुन्हा दाखल
लोकगर्जनान्यूज
परळी : तालुक्यातील सिरसाळा येथील घरकुलाची तपासणी करुन तिसरा हप्ता खात्यावर जमा करण्यासाठी सहा हजाराची लाच मागून ती स्वीकारताना खाजगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ( ACB ) ने सिरसाळा येथे रंगेहाथ पकडला आहे. याप्रकरणी खाजगी इसमासह कंत्राटी अभियंत्या असं दोघांवर गुन्हा दाखल झाला.
सिरसाळा ( ता. परळी ) येथील तक्रारदार यांना रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले. याची तपासणी करुन तिसरा हप्ता खात्यावर जमा करण्यासाठी मोबदला म्हणून लाचेची मागणी करण्यात आली. लाच देण्याची इच्छा नसल्याने सदरील तक्रारदाराने लाचलुचपत ( ACB ) विभाग बीड यांच्याकडे तक्रार केली. त्यानूसार आज बुधवारी ( दि. ८ ) सिरसाळा येथे सापळा लावण्यात आला. यावेळी खाजगी इसम बाळु उर्फ राजू लक्ष्मण किरवाले याने पंचायत समिती,परळी कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकासाठी सहा हजार लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी खाजगी इसम बाळु उर्फ राजू लक्ष्मण किरवाले रा. भीमनगर,सिरसाळा ( ता. परळी ) आणि सचिन रावसाहेब डिघोळे ( कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक,पं.स., परळी या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवसांपूर्वीच शिरुर का. तहसील कार्यालयात डेटा एन्ट्री ऑपरेटर लाच घेताना पकडला आज ही कारवाई त्यामुळे बीड जिल्ह्यात लाचखोरी वाढली असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.