ACB Trap- पाच दिवसात दुसरी कारवाई: आज लाचखोर तलाठी चतुर्भुज
लोकगर्जनान्यूज
बीड : प्लॉटची ऑनलाईन नोंद घेण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना ACB ने तलाठ्याला रंगेहाथ पकडले. सोमवारी एका ग्रामसेवकवर तर आज तलाठी चतुर्भुज झाल्याने पाच दिवसात दोन लाचखोरांवर ACB ने कारवाई केली. यामुळे बीड जिल्ह्यातील प्रशासनाला लाचखोरीची लागलेली किड दिसून येत आहे.
पाच दिवसांपूर्वी रोहयो अंतर्गत मंजूर विहिरीच्या अंतिम हप्त्यासाठी धारुर पं.स. च्या ग्रामसेवकाने 10 हजारांची लाच मागितली म्हणून ACB ने कारवाई केली. हे जिल्हा विसरला नाही तोच आज एक लाचखोर तलाठी ACB च्या जाळ्यात अडकला आहे. अमित नाना तरवरे ( वय ३२ वर्ष ) असे लाचखोर तलाठीचे नाव आहे. याच्याकडे गेवराई तालुक्यातील दैठणा आणि अतिरिक्त तलवडा सज्जाचा कारभार आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या प्लॉटची ऑनलाईन फेरफार नोंद घ्यायची होती. या नोंदीसाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना बीड ACB पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सदरील कारवाई आज शुक्रवारी ( दि. 24 ) दुपारी बीड ACB पथकाने उपाधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. पाच दिवसात दोन-दोन कारवाई होत असल्याने सामान्य नागरिकांमधून लाच प्रश्नी चिंता व्यक्त केली जात आहे.