क्राईम
ACB-लाचलुचपतची हॅट्ट्रिक;केज तालुक्यातील लाचखोर पोलीस कर्मचारी जाळ्यात
लोकगर्जनान्यूज
केज : माजलगाव व बीड असे सोलग दोन दिवस लाचलुचपत विभाग ( ACB ) पथकाने दोन सापळे यशस्वी करुन लाचखोर चेहरे उघड केले. एक दिवस मधी गेला नाहीतर केज तालुक्यातील युसुफ वडगाव ठाण्यातील पोलीस कर्मचारी आज शनिवारी ( दि. २७ ) ACB च्या जाळ्यात अडकला आहे. चार दिवसांतील ACB ने कारवाईची हॅट्ट्रिक केली.
बीड जिल्हा अन् लाचखोरी असे चित्र दिसत असून माजलगाव, बीड येथील कारवाई नंतर महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गुटखा प्रकरणी ५ हजारांची लाच घेताना ठाण्यातच पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB पकडला. हे वृत्त समजताच बीड पोलीस दलात खळबळ उडाली आहे. चार दिवसांत तीन लाचखोर ACB च्या जाळ्यात अडकल्याने बीड जिल्ह्यातील वाढती लाचखोरी दिसून येत आहे.